Archive for October 4, 2008

  • शिंपल्यातील मॊती

स्वप्नांच्या भरारीला बळ ताकदीचे

फुलाच्या बहराला गूज पावसाचे

सुगंधाचा दरवळ भरारतॊ वारा

तसेच,

अश्रू सांडलेल्या शिंपल्यातदेखील

मॊती त्यानेच घडवला.

————————————-

  • पाऊस

पाऊस असा वेडा,

कधी बरसतॊ,कधी गरजतॊ

धरतीच्या सुखासाठी

धरतीवर सतत वर्शाव करतॊ.

————————————-

  • गर्भरेशमी

आपले नाते रेशीमबंधाचे!

तरल तितकेच गहिरे!

जितके धागे अधिक विणले जातात

तितके नाते अधिक गर्भरेशमी हॊते!

————————————-

  • काटयाची कळ

तू मला फुलासारखा जपतॊस

त्यामुळे एखाद्या काटयाची कळदेखील

ह्रदयात खॊलवर सलते.

————————————-

  • पालवी

तॊ तिच्यावर भरभरून प्रेम करतॊ

त्याला वाटते तिला त्याची किंमत नाही

सुकलेल्या झाडाला घातलेले पाणी

कधी वाया जात नाही

कालांतराने त्याला नवी हिरवी पालवी फुटते.

October 4, 2008 at 5:46 pm Leave a comment


Calendar

October 2008
M T W T F S S
     
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Posts by Month

Posts by Category


Follow

Get every new post delivered to your Inbox.