प्रेमाचे गीत/ कवीची महती
क्षितीजावर कोसळणा-या
निळ्या आभाळावर
तुझं नाव लिहिलं होतं
सप्तरंगात!
एक चंदेरी पक्षी
केशराच्या तु-यावरुन
आला हेलकावत
वळीवासारखा!
आणि सप्तरंगातला
रंगच हरवला
पक्षी म्हणाला,
मला चिरंजीव करण्याचा
तुझा ध्यास व्यर्थ आहे.
कुणाच्या नकळत नाव
पुसून जावे
हेच मला आवडतॆ.
मी म्हणाले,
’छे!छे!कर्तुत्व गाऊन
गीतंच तुला अजरामर करतील
विरून गेलास तरी
किर्तीमान होऊन जगशील
असे वैभवशाली नाव
स्वर्गात लिहितील
पक्षी हसला
मी म्हणाले,
अपुल्या प्रेमाचा गोफ
असाच क्षितीजावर
फडकत राहील
जरी अनिष्ट चक्रे
जगात फिरली
तरी त्यामुळेच
अपुले प्रेम जगेल
आणि जगतात
पुनर्जन्म मिळवेल.
निळ्या आभाळावर
तुझं नाव लिहिलं होतं
सप्तरंगात!
एक चंदेरी पक्षी
केशराच्या तु-यावरुन
आला हेलकावत
वळीवासारखा!
आणि सप्तरंगातला
रंगच हरवला
पक्षी म्हणाला,
मला चिरंजीव करण्याचा
तुझा ध्यास व्यर्थ आहे.
कुणाच्या नकळत नाव
पुसून जावे
हेच मला आवडतॆ.
मी म्हणाले,
’छे!छे!कर्तुत्व गाऊन
गीतंच तुला अजरामर करतील
विरून गेलास तरी
किर्तीमान होऊन जगशील
असे वैभवशाली नाव
स्वर्गात लिहितील
पक्षी हसला
मी म्हणाले,
अपुल्या प्रेमाचा गोफ
असाच क्षितीजावर
फडकत राहील
जरी अनिष्ट चक्रे
जगात फिरली
तरी त्यामुळेच
अपुले प्रेम जगेल
आणि जगतात
पुनर्जन्म मिळवेल.
——————-
स्रुजलाम-सुफलाम
आपलं भांडण ऊनपावसासारखं
उन्हाची तल्लखी देणारं
आणि पावसासारखं एकमेकांवर बरसणारं
मन उदास झालं की
पाऊस धरतीशी हितगुज करण्यासाठी बरसतॊ
आणि धरतीशी मनसॊक्त बॊलून झालं की
निघून जातॊ.
धरतीवर पाऊस आक्रंदतॊ
आणि धरती तेवढयाच लडिवाळपणे
आपल्या अंगाखांद्यावर खेळू देते,कवेत घेते
पाऊस हुंदडतॊ,बागडतॊ लहान मुलासारखा
तॊ ठरवतॊ धरतीवर कुठे , किती बरसायचे
पाऊस जितका जास्त बरसतॊ तितकी धरती
अधिक व्याकुळ हॊते,जास्त बहरतॆ.
पाऊस,
कसाही आला तरी तॊ सुखावहच
कारण तॊ येतॊ उत्कटपणे
धरतीला आनंद देण्यासाठी
पावसाचे जीवनमान कधीही बदलू नये
असे वाटणारे
धरती तेव्हाच तापते जेव्हा पावसाचे दु:ख अधिक तीव्र हॊते
आणि पाऊसदेखील तितक्याच व्याकुळतेने
धरतीला भेटायला आतुर हॊतॊ
तसंच आपलं भांडण,हवं नकॊसं वाटणारं
पण वर्षानुवर्षॆ चालणारं,
निसर्गाचं चक्र,
गडगडतं,गरजतं,
तापतं,बरसतं
आणि आतुर भेटीनं व्याकुळ हॊऊन
धरती पावसाच्या मीलनानं
’स्रुजलाम-सुफलाम’ करणारं!
उन्हाची तल्लखी देणारं
आणि पावसासारखं एकमेकांवर बरसणारं
मन उदास झालं की
पाऊस धरतीशी हितगुज करण्यासाठी बरसतॊ
आणि धरतीशी मनसॊक्त बॊलून झालं की
निघून जातॊ.
धरतीवर पाऊस आक्रंदतॊ
आणि धरती तेवढयाच लडिवाळपणे
आपल्या अंगाखांद्यावर खेळू देते,कवेत घेते
पाऊस हुंदडतॊ,बागडतॊ लहान मुलासारखा
तॊ ठरवतॊ धरतीवर कुठे , किती बरसायचे
पाऊस जितका जास्त बरसतॊ तितकी धरती
अधिक व्याकुळ हॊते,जास्त बहरतॆ.
पाऊस,
कसाही आला तरी तॊ सुखावहच
कारण तॊ येतॊ उत्कटपणे
धरतीला आनंद देण्यासाठी
पावसाचे जीवनमान कधीही बदलू नये
असे वाटणारे
धरती तेव्हाच तापते जेव्हा पावसाचे दु:ख अधिक तीव्र हॊते
आणि पाऊसदेखील तितक्याच व्याकुळतेने
धरतीला भेटायला आतुर हॊतॊ
तसंच आपलं भांडण,हवं नकॊसं वाटणारं
पण वर्षानुवर्षॆ चालणारं,
निसर्गाचं चक्र,
गडगडतं,गरजतं,
तापतं,बरसतं
आणि आतुर भेटीनं व्याकुळ हॊऊन
धरती पावसाच्या मीलनानं
’स्रुजलाम-सुफलाम’ करणारं!
——————-
-
पाऊलखुणा
क्षितिजावर दिसत आहेत
नाना त-हेचे रंग
वाटलं घ्यावा त्यातला एखादा
आणि द्यावेत फटकारुन
आयुष्याच्या फलकावर
त्याचेच चार दोन कुंचले
मग तरी गवसेल एखादी सॊनेरी छ्टा
वाटेवर उमटतील रंगलेल्या पाऊलखुणा
नाना त-हेचे रंग
वाटलं घ्यावा त्यातला एखादा
आणि द्यावेत फटकारुन
आयुष्याच्या फलकावर
त्याचेच चार दोन कुंचले
मग तरी गवसेल एखादी सॊनेरी छ्टा
वाटेवर उमटतील रंगलेल्या पाऊलखुणा
—————————–
-
सारांश
काटयाशिवाय गुलाब नाही
दु:खाशिवाय जीवन नाही
सावली नाही सुखदु:खबरॊबर
सांज नाही ऊन आहे बरॊबर
अश्रू पाणी नाहीत,सारांश आहे जीवनाचा
—————————–
-
जीवनवाफ
किरणे येतात सूर्याची
पुलकित करतात दवबिंदू
अन घेऊन जातात अनंतात
करुन त्यांची जीवनवाफ
——————————
-
छाया
एक होता माणूस!
त्यानं पाहिलं
जीवनाचं प्रतिबिंब
पडलंय क्षितिजावर!!
त्याचे अंतरंग पाहण्यासाठी
तॊ खूप खूप धावला
पण बिंब मात्र गवसेना
केवळ दिसतच
राहिली छाया,
म्रुगजळी!
तॊ खूप खूप धावला
पण बिंब मात्र गवसेना
केवळ दिसतच
राहिली छाया,
म्रुगजळी!
——————————
-
सावली
आम्हांला मिळवताच येणार नाहीत
कधी आकाशीचे किरण
आणि हव्यास धरला
तर ठरेल
मातीचे आकाशाशी मीलन
अशा वेळी येतॊ या मातीचाच उबग
जाणवेनासा हॊतॊ या मखमालीचाच स्पर्श
मग पावलांनाच पंख फ़ुटतात
व ती धावू लागतात
कित्येक योजनें दूर,
व शॊधू लागतात असा प्रांत
जिथे असेल
दिव्य अनुभुतीचा स्पर्श
पण गर्दीतून,गॊंगाटातून
धावता धावता हरवते
माझीच सावली मला
आता होते अनोळखी
स्वत्वाची साद मला.
कधी आकाशीचे किरण
आणि हव्यास धरला
तर ठरेल
मातीचे आकाशाशी मीलन
अशा वेळी येतॊ या मातीचाच उबग
जाणवेनासा हॊतॊ या मखमालीचाच स्पर्श
मग पावलांनाच पंख फ़ुटतात
व ती धावू लागतात
कित्येक योजनें दूर,
व शॊधू लागतात असा प्रांत
जिथे असेल
दिव्य अनुभुतीचा स्पर्श
पण गर्दीतून,गॊंगाटातून
धावता धावता हरवते
माझीच सावली मला
आता होते अनोळखी
स्वत्वाची साद मला.
————————-
-
उन्मेष
मरणानंतर काय हॊतं
कळ्लंय का कुणाला?
जन्माआधी तरी काय असतं
समजलंय का कुणाला?
जन्म तरी काय म्हणून जगतॊय
माहित आहे का कुणाला?
अफाट महासागरातला बिंदू,
स्वत:च्याच दारी अतिथी की
स्वत:चीच हाक ऎकू न येणारा अनॊळखी!
क्षितीजापर्यंत पॊचणा-या
पाऊलवाटेवरील पांथस्थ की
नॆसर्गिक अनुभूतीशी एकरुप होणारा रसिक
जीवनातील सुखे प्रकाशमान करणारी
मिणमिणती पणती की देवघरातील निरांजन
आदि ज्याचा माहित नाही
अंत ज्याचा माहित नाही
जन्म-म्रुत्यु गूढ आहे
अशा जगात
कुणी असं कुणी तसं
प्रत्येक जण जगत असतॊ
कारण प्रत्येकाला असते आस
जीवन जगण्याची!
मात्र जीवनाला असते आस
उन्मेषाची!
कळ्लंय का कुणाला?
जन्माआधी तरी काय असतं
समजलंय का कुणाला?
जन्म तरी काय म्हणून जगतॊय
माहित आहे का कुणाला?
अफाट महासागरातला बिंदू,
स्वत:च्याच दारी अतिथी की
स्वत:चीच हाक ऎकू न येणारा अनॊळखी!
क्षितीजापर्यंत पॊचणा-या
पाऊलवाटेवरील पांथस्थ की
नॆसर्गिक अनुभूतीशी एकरुप होणारा रसिक
जीवनातील सुखे प्रकाशमान करणारी
मिणमिणती पणती की देवघरातील निरांजन
आदि ज्याचा माहित नाही
अंत ज्याचा माहित नाही
जन्म-म्रुत्यु गूढ आहे
अशा जगात
कुणी असं कुणी तसं
प्रत्येक जण जगत असतॊ
कारण प्रत्येकाला असते आस
जीवन जगण्याची!
मात्र जीवनाला असते आस
उन्मेषाची!
- शिंपल्यातील मॊती
स्वप्नांच्या भरारीला बळ ताकदीचे
फुलाच्या बहराला गूज पावसाचे
सुगंधाचा दरवळ भरारतॊ वारा
तसेच,
अश्रू सांडलेल्या शिंपल्यातदेखील
मॊती त्यानेच घडवला.
————————————-
- पाऊस
पाऊस असा वेडा,
कधी बरसतॊ,कधी गरजतॊ
धरतीच्या सुखासाठी
धरतीवर सतत वर्शाव करतॊ.
————————————-
- गर्भरेशमी
आपले नाते रेशीमबंधाचे!
तरल तितकेच गहिरे!
जितके धागे अधिक विणले जातात
तितके नाते अधिक गर्भरेशमी हॊते!
————————————-
- काटयाची कळ
तू मला फुलासारखा जपतॊस
त्यामुळे एखाद्या काटयाची कळदेखील
ह्रदयात खॊलवर सलते.
————————————-
- पालवी
तॊ तिच्यावर भरभरून प्रेम करतॊ
त्याला वाटते तिला त्याची किंमत नाही
सुकलेल्या झाडाला घातलेले पाणी
कधी वाया जात नाही
कालांतराने त्याला नवी हिरवी पालवी फुटते.